VIDEO : आमदार नारायण कुचेच्या भाच्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला

Foto


जालना भारतीय जनता पक्षाचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप आहे. आमदार कुचे यांच्या सांगण्यावरुन हल्ला झाल्याचे जखमी भीमराव यादवराव डिघे याने म्हटले असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आमदार कुचे आणि त्यांच्या भाच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

 

काय आहे प्रकरण

आमदार कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे याने सोमवारी (ता. १२) राष्ट्रवादीचे सोशल मीडिया सेलचे कार्यकर्ते भीमराव डिघे (३५) याच्यावर तलवारीने हल्ला केला आहे. बदनापूर तालुक्यातील ढवळेश्वर भागात हा हल्ला करण्यात आला. भीमराव डिघेवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

 

काय आहे व्हिडिओमध्ये

जखमी भीमराव डिघे रक्ताने माखलेल्या आवस्थेत रस्त्यावर पडलेला आहे. काही लोक त्याचा व्हिडिओ शूट करत आहेत, तर काही त्याला कोणी मारले याची विचारणा करताना दिसत आहेत. जखमी भीमराव डिघे हिंदीमध्ये सांगतो, की आमदार नारायण कुचे के लडके थे...



दीपकने काढली होती महिला पोलिसाची छेड

दीपक डोंगरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समोर येत  आहे. काही दिवसांपूर्वी दीपकने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याची भरचौकात छेड काढली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता दीपकने तलवारीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. यामुळे आमदार नारायण कुचे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.




Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker